पुणे: राजेपद राजांनी सांभाळलं पाहिजे, त्यासाठी सातत्याने खबरादारी घेतली पाहिजे जर असं झालं नाहीतर बऱ्याचंदा त्याचा विनाकारण अनेकांना यातना सहन कराव्या लागतात अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुनावलंय. तसंच जनतेतून आपण निवडून आलाय याचं भान बाळगावे अशी सल्लावजा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
न्यूज १८ लोकमतचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी शरद पवारांची खास मुलाखत घेतली. त्यावेळेस ते बोलत होते. यावेळी त्यांनी किल्लारी भूकंप, संघ आणि काँग्रेसबद्दल विस्तृत भाष्य केलं.
संघ त्यांची संकुचित भूमिका सोडून आपण व्यापक आहोत असा जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय असं पवार म्हणाले. तसंच आपण सध्या गोळवलकरांचं विचारधन हे पुस्तक वाचतोय, माझ्या घरी आणि पुण्यातील घरीही या पुस्तकाच्या प्रती आहे असंही त्यांनी सांगितलंय.
उदयनराजेंचे टोचले कान
माझ्या पक्षात काही राजे फिरताय. हल्ली ते सारखे प्रकृतीची चिंता करत आहे. त्यामुळे राजेपद राजांनी सांभाळलं पाहिजे, त्यासाठी सातत्याने खबरादारी घेतली पाहिजे जर असं झालं नाहीतर बऱ्याचंदा त्याचा विनाकारण अनेकांना यातना सहन कराव्या लागतात. हे मी माझ्या अनुभवातून आणि सहकाऱ्यांच्या वतीने सांगतोय. जाणता राजा हे म्हणण्यास फारसं काही वाटत नाही. प्रश्न असा आहे की, समाजकारणासाठी तुम्ही राजकारणात आलाय. जनतेच्या पाठिंब्याने तुम्ही इथं पर्यंत पोहोचला आहात. त्यांच्या सुखदुखाच्या वेळी तुम्ही तिथे हजर राहिले पाहिजे अशा शब्दात पवारांनी उदयनराजेंचे कान टोचले.
किल्लारी भूकंपाच्या आठवणींना उजाळा
लातूरच्या भूकंपाच्या दिवशी गणपती विसर्जन होतं,सगळं गृह खातं, अधिकारी तणावात होते. परभणीच्या तणावपूर्ण परिस्थितीची माहिती घेऊन मी झोपायला गेलो पहाटे काचा हादरल्या मला तेव्हा शंका आली म्हणून कोयनेला भूकंप मापन केंद्रावर फोन केला तेव्हा समजलं भूकंपाचा केंद्रबिंदू लातूरच्या किल्लारील होता. फोन करायचा तर फोन लाईन बंद होती. मग पदमसिंह पाटलांना फोन केला विमान तयार झालं. मी लातूर ला पोहोचलो, मी आणि सोबतचे अधिकारी पाहिले होतो.
तिथे गेल्यावर भीषण परिस्थिती होती. घर पडलेली,माणसं अडकलेली आणि वरून पाऊस पडतोय. आजूबाजूच्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले आणि शक्य असेल तेवढी सगळी सामुग्री असेल तेवढी घेऊन यायला सांगितलं.
टेंडर आणि बाकीच्या प्रोसेस करण शक्य नव्हतं त्यांना सांगितलं माझ्या सूचना आहेत असं नंतर लिहा आणि काम सुरू करा असं सांगितलं असं पवारांनी सांगितलं.
'लातूर भूकंपाच्या वेळी काही निर्णय वेडेपणाचे होते'
लातूरच्या भूकंपामध्ये अनेक निर्णय वेडेपणाचे होते पण घ्यावे लागले. प्रवीण परदेशी आणि अनेक अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं. आयएएस अधिकारी आहेत की कुली वाटावेत इतकं काम केलं.
सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना गाव वाटून दिली. पहिल्या तीन दिवसांत जखमींना बाहेर काढणे उपचार करण ही काम केली. अनेक जणांची प्रेत बाहेर काढलं ती अंत्यविधी करण्यासाठी आसपासच्या सगळ्या वखारीतून लाकडं मागवली आणि अंत्यसंस्कार केले,पण ते एवढं भयानक दृश्य होत की 40 गावांमध्ये मोठी आग लागलेली असावी असं भयानक दृश्य होतं असा थरारक अनुभवही त्यांनी सांगितला.
'नरसिंहरावांनी मीच थांबवलं'
किल्लारीला भेटीला येण्यावरून नरसिंहराव बरोबर वाद झाला. तिथे आपत्ती पर्यटन आल्याप्रमाणे गर्दी झाली होती त्यामुळे की त्यांना सांगितलं तुम्ही आता येऊ नका,मी सांगितल्या वर या असंही पवारांनी सांगितलं. ते पुढे म्हणतात, यापेक्षा भयानक आपत्ती होती ती मुंबई स्फोटाची...मला नरसिंहरावांनी जवळपास ब्लॅक मेल करुनच मुंबईला पाठवलं होतं. स्फोटानंतर त्यांचे स्फोटक आणि संबंध याचा कराचीशी असलेला संबंध लक्षात आला.
आणि वाजपेयींनी जबाबदारी माझ्यावर सोपवली
या देशात एका आपत्तीमध्ये मदत करण्याची भावना फार मोठी आहे. 2005 च्या भुजच्या भूकंपानंतर आपतिनिवरणाच धोरण ठरवावं असं ठरलं. सोनिया गांधी नी माझं नाव सुचवलं आणि वाजपेयींनी ते काम माझ्याकडे सोपवलं त्याला कॅबिनेट दर्जा दिला. जगात अनेक देशात गेलो जपानला गेलो आणि त्यांच्याकडून माहिती मिळवून धोरण तयार केलं,कायदा करून राज्य राज्यात आपत्ती निवारण टीम उभ्या केल्या पाहिजे असा 600 पानांचा रिपोर्ट दिला आणि ते झालं असंही पवार म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours