पुणे, 20 मे: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरु झाला आहे. लॉकडाऊनमध्ये रेड, ऑरेंज, ग्रीन आणि कन्टेंन्मेंट झोनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यात धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही लॉकडाऊनबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
चौथ्या लॉकडाऊनमधील नवीन नियमावली राज्यसरकारने केली जाहीर. राज्यात आता तीन झोन केले आहेत. यात 1) कंटेनमेंट झोन, 2) रेड झोन, 3) नॉन रेड झोन असतील. ही नियमावली मुंबई, नवी मुंबई, पुणे (शहर), सोलापूर (शहर), औंरंगाबाद (शहर), मालेगाव, धुळे, नाशिक (शहर), जळगाव, अकोला आणि अमरावती हे परिसर रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान रात्री 7 ते सकाळी 7 दरम्यान कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे.
लॉकडाऊन 4 ची केंद्र आणि राज्याची नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्यात आता केवळ 3 टक्के क्षेत्र हे प्रतिबंधित उरलं आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकाने, व्यवसाय सुरू व्हायचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मॉल, रिक्षा, कॅब, बसेस केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा हे बंदच राहणार आहेत.
सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेन्मेंट क्षेत्रात।मात्र फक्त जीवनावश्यक सुविधा सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरेलू कामगारांना काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रमुख रस्ते ,चौक सोडून काही ठिकाणी पथारी व्यवसाय करण्यासही मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे शहरासाठी लॉकडाऊनचे वेगळे नियम असणार आहेत. एवढेच काय तर आयटी कंपन्याही सुरु होणार आहेत. याशिवाय पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रांसाठी जीवनावश्यक वस्तुंच्या दुकांनासह या क्षेत्राबाहेरील बहुतांश व्यवहार आजपासून( 20 मे) सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूनक व्यवस्था बंद राहणार आहेत. याशिवाय मॉल, मल्टीप्लेक्स, हॉटेल, सलून, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत.
असे असतील नवे नियम
-पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोनसाठी प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे.या क्षेत्रांमध्ये रुग्ण जास्त असल्याने व्यवहार सुरू होणार नाहीत.
-मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार. यामध्ये दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, दवाखाने, स्वयंपाकाचा गॅस या व्यतिरिक्त इतर सुविधांना परवानगी नाही.
-प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेन्मेंट  झोन ) घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (मोलकरीण ) मालकाची तयारी असेल तर परवानगी. मात्र डोमेस्टिक हेल्प करणारी व्यक्ती ही प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असावी.
-31 तारखेपर्यंतच्या लाॅकडाऊनसाठी नवी नियमावली तयार करण्यात येईल.
-सर्व दुकानांना ठरवेल्या वारी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रात मात्र परवानगी नसेल.
-पथारी व्यावसायिकांनाही ठराविक रस्ते वगळता व्यवसाय करता येणार आहे, असं समजतं.

प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात बँका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या, बांधकाम सुरु होतील. विशेष म्हणजे काही रस्ते वगळता बहुतांश परिसरात काही व्यावसायिकांनाही परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर घटकांना विशेषत: नागरिकांना रस्त्यावर येण्यास बंदी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours