बुलडाणा: दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी, शेतकऱ्यांवर खोटे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला पर्वा नाही. सरकार आणि पोलीस प्रशासन दादागिरी करत असेल तर वेळेप्रसंगी कायदा हातात घेवून आम्ही उत्तर देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिलाय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 20 ऑक्टोरबर रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलना पुकारण्यात आलं होतं. दरम्यान बुलडाण्यात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी सकाळी 7.00 वाजेपासून शेगाव-बैतुल महामार्ग रोखून धरला होता. या प्रकरणी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, प्रशांत डिक्कर यांच्यासह 125 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी 'स्वाभिमानी'ने 20 ऑक्टोबर रोजी पश्चिम विदर्भ आणि मराठवाडयात चक्काजाम आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. बुलडाणा जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सकाळी 7.00 वाजेपासून शेगाव-बैतुल महामार्ग रोखण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी रविकांत तुपकर, प्रशांत डिक्कर यांच्यासह 125 शेतकऱ्यांवर भादंवि कलम 141,143, 341 भादंवि सहकलम 135, म. पो. कायदा सहकलम 15, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दंगल घडवणे, रस्ता अडविणे, प्रदुषण आणि जाळपोळ करणे असे विविध स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours