भंडारा : संपूर्ण महाराष्ट्र दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल दिनांक 3 नोवेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार होता. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जाहीर होणारा निकाल 21 /12/ 2025 रोजी जाहीर करण्यात येणार असून या कालावधीत वोटिंग मशीन वर आरोप तत्यारोप करण्याच्या घटना वाढत असून राजकीय पक्ष प्रशासनावर आरोप तत्यारोप करीत असून कर्मचारी, अधिकार्यांची व प्रशासनाची बदनामी करण्याचे काम करीत असल्याचे अनेक वृत्तपत्रातून प्रकाशित होतात असलेल्या बातम्या मुळे लक्षात येते. त्यामुळे आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमांच्या विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, विदर्भ कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, राहुल थोटे, पुरुषोत्तम गायधने, आशिष शेंडे यांनी निवेदन दिले कि,महाराष्ट्रात स्वराज्य संस्थेच्या घेण्यात आलेल्या निवडणुका रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावे. असे निवेदन निवासी जिल्हा अधिकारी लीना फलके यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयुक्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.



Post A Comment:
0 comments so far,add yours