भंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
लाखनी----- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ राेजी सापळा कार्यवाही आयाेजित केली असता सापळा कार्यवाही दरम्याण दिनेश विष्णुजी कुंभलकर ,कनिष्ट लिपीक,प्रभारी दुय्यम निबंधक कार्यालय लाखनी ,व ऑपरेटर समीर निसार शेख यांनी तक्रारदारास घराची रजिष्ट्रि करण्याकरिता तक्रारदाराकडुन तडजाेडीअंती २२हजार रु.लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्या कडे नाेंदविली असता ,दाेन्ही आराेपी विरुद्ध पाे.स्टे.लाखनी येथे गुन्हा नाेंद करण्यात आला आहे।
------तक्रारदार हे बस स्थानक लाखनी जवळ राहत असुन लाखनी येथील रहिवासी असुन येथे पुर्ण बांधकाम असलेले घर १९ लाख रु.घेतले हाेते.सदर घराची निबंधक कार्यालय येथे रजिष्ट्रि केली असता सदर घराची रजिष्ट्रि करिता समीर शेख ऑपरेटर यांनी स्वत:करिता व दिनेश कुंभलकर दुय्यम निबंधक प्रभारी यांच्या करिता असे एकुण २२००० /- रु.लाचेची मागणी केली असता तक्रारदाराने दिनेश कुंभलकर यांना १५,०००/-रु.व समीर शेख ऑपरेटर यांना १०००/-रु.असे एकुन १६,०००/- रु.दिले हाेते.त्यानंतर उर्रवरित ६,०००/-रु.समीर शेख व दिनेश कुंभलकर यांनी तक्रारदारास रजिष्ट्रि करिन देण्याचा माेबदला म्हनुन ६,०००/- रु.ची मागणी केली.तक्रारदारास दिनेश कुंभलकर व समीर शेख ऑपरेटर यांनी मागणी केलेली लाचरक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे तक्रार नाेंदविली.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ राेजी सापळा कार्यवाही आयाेजित केली असता कार्यवाही दरम्यान दिनेश कुंभलकर कनिष्ट लिपीक दुय्यम निबंधक प्रभारी यांनी तक्रारदारास वरिल कामाकरिता तक्रारदाराकडुन ६,००० रु.लाचेची मागणी करुन तडजाेडीअंती ५,०००/- रु.समीर शेख ऑपरेटर लाखनी यांच्या हस्ते स्विकारली यावरुन दाेन्ही आराेपींविरुद्ध लाखनी येथे कलम ७,१२ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (सुधारित) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.सदर कार्यवाही श्रिकांत जी धिवरे (अतिरीक्त कार्यभार) पाे.अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर,राजेश दुहलवार अप्पर पाे.अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर यांच्यामार्गदर्शनात महेश चाटे पाे.उपअधिक्षक ,याेगेश्वर पारधी पाे.निरीक्षक,प्रताप भाेसले पाे.नि.,सचीन हलमारे,अश्विन कुमार गाेस्वामी,काेमल बनकर,शेखर देशकर,पराग राऊत,दिनेश धार्मीक यांनीव सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांनी यशस्वी कार्यवाही केली आहे।
Post A Comment:
0 comments so far,add yours