सपादिका...सुनिता परदेशी
त्यागमूर्ती ,शेतकरी नेते नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेला गहुली(पुसद) येथून सुरुवात.

यवतमाळ : जिल्ह्याचे सुपुत्र हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात यावे या मागणीसाठी गहुली ते दिल्ली स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात गहुली (पुसद) करण्यात आली. आज (ता.१ जुलै) ला वसंतराव नाईक यांच्या जयंतीपासून ते ५ डिसेंबर पर्यंत हि मोहिम चालणार आहे.


या साठी यवतमाळ जिल्ह्यातील मान्यवरांच्या समितीचे गठण करण्यात आले असून आज त्यागमूर्ती शेतकरी नेते नानभाऊ पटोले यांच्या पहिल्या स्वाक्षरीने या मोहिमेला सुरूवात झाली. अभियानाच्या कालावधीत माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यभर दौरे करून अभियानाबाबत जनजागरण करण्यात येईल.
हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक ‘भारतरत्न’ पुरस्कार अभियान समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल.यावेळी आमदार मनोहरराव नाईक , माजी आमदार विजया धोटे,शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार,शेतकरी नेते गजानन अमदाबादकर,दीपक आसेगावकर,ऍड. सचिन नाईक, सुकाणू समितीचे नेते प्रशांत पवार,शेतकरी नेते मनिष जाधव,किरण कुमरे,राजेंद्र हेंडवे,डी. तडसे,लक्ष्मण जाधव,साहेबराव पवार,धनवतसिंग कपूर,लालसिंग अजमेरकर,अंकुश वानखेडे, आदी लोक उपस्थित होते
या अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहिमेसह विवीध कार्यक्रम राबविण्यात येईल. स्व.वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी शेतक-यांसाठी विवीध योजना राबविल्या. या काळात राज्यभरात हरितक्रांती आली होती. त्यामुळेच त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणुन ओळखल्या जाते. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे. त्यांनी आपले जीवन देशसेवेत घालविले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे.




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours