नागपूर : नागपुरातल्या वर्धमान नगरमध्ये कोळसा व्यापाऱ्यावर हल्ला करून 70 लाख रूपये लुटल्याची घटना घडलीय. कोळसा व्यापारी कैलाश अग्रवाल आणि त्यांचे बंधू दिलीप अग्रवाल यांचे भंडारा मार्गावरील पॉवर हाऊस चौकात शिवम टॉवरमध्ये कार्यालय आहे. कार्यालयातून निघाल्यानंतर शुक्रवारी रात्री वर्धमान नगर भागात हा हल्ला करण्यात आलाय.
दुसऱ्या माळ्यावरील या कार्यालयातून अग्रवाल बंधू कोळशाचा व्यापार करतात. कैलाश अग्रवाल यांचा मुलगा सचिन कॅशिअर राजेश भिसीकरसोबत घरी जाण्यासाठी निघाला. राजेशच्या हातात नोटांनी भरलेली बॅग होती. त्यात ६०-७० लाख रुपये ठेवले होते. शिवम टॉवरखाली उतरून सचिन अग्रवाल आणि राजेश भिसीकर कारच्या दिशेने जात होते. या मार्गावर सिमेंट रोडचे काम सुरू आहे. त्यामुळे कार कार्यालयापासून दूर अंतरावर ठेवलेली होती. शिवम टॉवरखाली उतरताच तीन चोरट्यांनी सचिन आणि राजेशच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली तर त्यांच्या दोन साथीदारांनी राजेशपासून नोटांनी भरलेली बॅग हिसकावली.
तीन दिवसांपूर्वी गँगस्टर पिन्नु पांडेवर झालेल्या गोळीबारानंतर हा शहरातील दुसरा मोठा गुन्हा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours