मूतक।।अभिषेक सावन कटकवार
क्राईम रिपोर्ट .  सुरज परदेशी संपादक
मृतक नामे- अभिषेक सावन कटकवार, वय २१ वर्षे, रा. मेंढा / पोहरा, ता. लाखनी, जिल्हा- भंडारा, जात- भंगी याची सासु आणि पत्नीला, आरोपी चिराग गजभिये याने मोबाईल फोन वरुन मॅसेजेस केल्यामुळे, काही दिवसा आधी मृतकने आरोपी चिराग गजभिये याला हटकल्यामुळे त्यांच्यात तोंडी वादविवाद झाले होते. त्यानंतर, गणेशपुर/भंडारा येथे दिनांक दिनांक २१/०८/२०२३ चे ११:०० वा. ते ११:३० वा. दरम्यान, मृतक अभिषेक कटकवार आणि आणि त्याचा लहान भाऊ अरमान कटकवार, वय १९ वर्षे (फिर्यादी) तसेच, मृतकचे तिन मित्र, प्रत्यक्षदर्शी साक्षदार हे गणेशपर / भंडारा येथुन मृतकच्या सासुच्या घरुन दोन बाईक ने जात असताना, आधीच्या वरील नमुद प्रमाणे भांडणाच्या कारणावरुन, आरोपींनी एकत्र येऊन, गैरकायद्याची मंडळी तयार करुन, मृतक यास अश्लिल शिवीगाळ करून, नालीवरील सिमेंट चे दगड, विटांनी मृतकच्या डोक्यावर मारहान करुन तसेच, मृतकच्या हनुवटीखाली आणि पोटावर चाकूने गंभिर घाव घालून मृतकचा खुन केल्याचे, फिर्यादी/मृतकचे भावाचे तोंडी रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन, भंडारा येथे दिनांक २२/८/२०२३ चे ०५:५९ वा. एकुण सात (०७) आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ५६५ / २०२३ कलम कलम ३०२, १४३, १४६, १४७, १४८, १४९, २९४ भा.दं.वि. सहकलम ४/२५ भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी हे गुन्हा करुन पसार झाल्याने, गुन्हे प्रकटीकरण पथक, पो. स्टे. भंडारा यांनी माहितगार सुत्रांच्या माध्यमातून कशोशीचे प्रयत्न करुन अवघ्या १२ तासांचे आत खालील नमुद प्रमाणे मुख्य आरोपींसह एकुण ०५ आरोपींना शोधुन त्यांना अटक करण्यात आली असून, ऊर्वरीत ०२ फरार आरोपींचा शोध भंडारा पोलीस घेत आहेत.

आरोपींना वेळीच जेरीस आणण्याची कामगिरी ही ठाणेदार पो.नि. गोकुळ सुर्यवंशी, सपोनि विनोद गिरी, सपोनि अशोक जायभाये, पोउपनि मंगेश कराडे, पोहवा वाघमारे / ९८२, पोअं झलके / २७९, पो.अं. लांडगे / १४९३, पोना कुकडे / ११४९ यांनी मोलाची कामगिरी पार पाडली असून, मा. पोलीस अधीक्षक, श्री. लोहीत मतानी, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. ईश्वर कातकडे तसेच, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, भंडारा, डॉ. अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात, सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, गोकुळ सुर्यवंशी आणि तपास पथक पोहवा शहारे ७९६, पोहवा भोंगाडे / ६४० पोलीस स्टेशन, भंडारा हे करीत आहेत
अटक आरोपींची नावे :-

१) चिराग नमोद गजभिये, वय २७ वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा,

२) पराग परसराम सुखदेवे, वय ४७ वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, भंडारा. ३) लुकेश ऊर्फ लुक्का संजय जोध, वय २५ वर्षे, रा. आंबेडकर वार्ड, गणेशपुर भंडारा.

४) श्याम सुखराम उके, वय ३४ वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा,

५) सागर देवानंद भुरे, वय २५ वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड, भंडारा,

पाहिजे आरोपी :-

६) मोन्या ऊर्फ मोनार शेंडे, रा. गणेशपुर/भंडारा. ७) तेजस सुनिल घोडीचोर, रा. गणेशपुर/भंडारा.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours