क्राईम रीपोटर  : संदीप क्षिरसागर 

लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांने महाविद्यालयात कार्यरत असलेल्या परीचारकावर बंदुकीने सिनेस्टाईल गोळी झाडली

ही घटना आज दीनांक २३ आक्टोबर २०२१  ला शनिवारी सकाळी ७:३०  

वाजेच्या सुमारास घडली

गोळी लागताच परीचर शुभाष गोपाल आगाशे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेअमित हुकुमचंद गायधनी असे मारेकरी संस्थाचालक व भुगोल विभाग प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव आहे

प्राप्त माहितीनुसार संस्थाचालक असलेला अमित हुकुमचंद गायधनी हा 

नवशक्ती पीठ संस्था मुयमाडी/ सावरी

मध्ये सहसचिव आहे. तसेच भाजप मध्ये उच्चपदाधिकारी म्हणून कार्य करीत आहे. राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळकीचा फायदा घेत

आरोपी अमित गायधनी कर्मचार्यांना नेहमी अपमानित करीत होता, याची तक्रार महाविद्यालयात कार्यरत कर्मचारी व प्राध्यापकांनी दीली होती

महाविद्यालयात कर्मचारी संस्थाचालकाच्या मुजोरीला कटाळले होते. अशी चर्चा शहरात तसेंच महाविद्यालय मध्ये आहे. संस्थाचालकाने कर्तव्यावर कार्यकरत असलेल्या परीचारकावर शनिवार सकाळी ७:३०  वाजेच्या सुमारास गोळी झाडली , गोळी ही परीचराच्या छातीला लागली त्यामुळे गंभीर दुखापत झाली. गभीर जखमी झाल्याने त्यांना नागपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी गोळी झाडुन प्रसार होण्याच्या तयारीत असलेल्या संस्था चालक अमित गायधनी याला लाखनी पोलिसांनी भंडा-यात अटक केली

या घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस स्टेशन चे ठाणेदार करीत आहेत

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours