जिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार

भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी शेखर धकाते यांची सह संचालक आरोग्य विभाक नागपूर येथे बधोतरी मिळाली असून त्यांच्या स्थानानंतर प्रसंगी शिवम हॉटेल च्या सभागृहात नागरिक सत्कार समिती च्या वतीने निरोप समारंभ व भव्य नागरीक सत्कार करण्यात आला 


कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आ रामचंद्र अवसरे होते तर विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित लोकसभा सदस्य मधुकर कुकडे प्रामुख उपस्थित माजी नगर परिषद उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे डॉ नडगे डॉ नाईक डॉ डोकरिमारे  डॉ जक्कल सुरज परदेशी राजकुमार दहिकार बंडू मलोडे विष्णू लोणारे सौ सुनीता परदेशी रुपाली दहेकर आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सत्कारमूर्ती डॉ राविशेखर धकाते यांना शुभेच्या पर मार्गदर्शन करताना खा मधुकर कुकडे यांनी डॉ धकाते हे सामान्य माणसाचे मन जोडणारे वैक्तीमहत्व असल्याचे सांगितले तर आमदार अवसरे यांनी डॉ धकाते यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांची कारकीर्द अतिशय महत्वाची होती असे सांगून पुढे भंडारा जिल्हासाठी वैदयकीय सेवा द्यावी अशी आशा व्यक्त केली


तर सत्कारमूर्ती डॉ धकाते यांनी सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करतानी मी वैद्यकीय क्षेत्रात कश्या प्रकारे आलो यांचे अनेक उदाहरण देऊन माहिती दिली  डॉ हे मनुष्याचे जीव वाचविण्याचे कामे करत असतात असे सांगून वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्णांना माणुसकीची वागणूक देऊन त्यांचा जीवाचे रक्षण करावे असे सांगितले व त्यांनी प्रसार माध्यमांची अतिशय चांगले सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले  


यावेळी खा मधुकर कुकडे आ रामचंद्र अवसरे सूर्यकांत इलमे  सुरज परदेशी प्रा बबन मेश्राम विष्णू लोणारे  प्रा नरेश आंबिलकर  राजकुमार दहिकर व नागरी समिती सदस्यांच्या हस्ते सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला 


कार्यक्रमाचे संचालन प्रा बबन मेश्राम व विष्णू लोणारे यांनी केले 
तर आभार प्रदर्शन प्रा नरेश आंबिलकर यांनी केले तसेच कार्यक्रम यशवी करण्यासाठी वैष्णवी परदेशी चंद्रशेखर भिवगडे  बंडू मलोडे प्राची रामटेके पायल घटबांधे रुपाली लोणारे रिंकू कावळे जयंत बोटकुले नितीन नागदेवे संजीव मेश्राम वैशाली मेश्राम यांनी सहकार्य केले


विडियो देखे - 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours