भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वाड येथील अरोमीरा नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेणाऱ्या 18  विद्यार्थिनीची फसवणूक करणाऱ्या व विद्यार्थिनीचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या संस्थाचालकावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवदेन अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच विदर्भाध्यक्ष सुरज परदेशी, विदर्भ कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, भंडारा कार्याध्यक्ष दीपक वाघमारे अमन तांडेकर, गोलू निंबाळते परविन निंबाते यांनी निवासी जिल्हा अधिकारी लीना फलके यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन ,अध्यक्ष महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई ,पोलीस अधीक्षक भंडारा ,यांना निवेदन दिले की अरोमीरा नर्सिंग  कॉलेजची निष्पक्ष चौकशी करून मुलींचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या व त्यांचे भविष्य उध्वस्त करणाऱ्या संस्थाचालकाची तत्काळ योग्य चौकशी करून त्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच 18 विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यात यावे व त्यांचे भविष्य खराब होऊ देऊ नये अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours