पुणे, 30 जुलै : हल्ली प्रेमात विश्वासघात करण्याचं प्रमाण अतिशय वाढलं आहे. यातूनच मग कायदा हाती घेण्याच्या गोष्टी सररास घडत असल्याचंही दिसत आहे. अशीच काहीशी संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात इंटरनेट कॅफेमध्ये एका तरुण आणि तरुणीची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. लग्नाचं आमिष दाखवत या तरुणानं तरुणीसोबत शारीरिक संबंध केले. नंतर मात्र त्यानं लग्नासाठी टाळाटाळ करत गावाकडे पलायन केलं. यानंतर संतापाच्या भरात प्रेयसी थेट प्रियकराच्या गावाकडील घरावर धडकली. भेट घेऊन तिनं प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावला. पण यावेळे जे काही घडलं ते लज्जास्पद आणि संतापजनक होतं. प्रियकरानं आई आणि मामासोबत मिळून प्रेयसीला अमानुष मारहाण केली.  'लव सेक्स और धोखा' या बॉलिवूड सिनेमाला शोभावी अशीच ही घटना घडली. हा प्रकार जालना जिल्ह्यातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का पोहोचला आहे. तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करून समुपदेशनासाठी सखी मदत केंद्रात हलवण्यात आलं आहे. पीडित तरुणी पुण्यातील रहिवाशी असून इंटरनेट कॅफे चालवणाऱ्या मूळच्या जालना जिल्ह्यातील पिरकल्यानं गावच्या एका तरुणाशी प्रेमसबंध जुळले. मुलीने दिलेल्या माहितीनुसार दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिने थेट पुण्यावरून प्रियकराचे घर गाठले. दरम्यान प्रियकराच्या घरी गेल्यावर त्याच्या घरच्या लोकांनी आपल्याला बेदम मारहाण करून हाकलून लावल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
दरम्यान गावातील एक व्यक्तीने माणुसकी दाखवत पीडित तरुणीला उपचारासाठी शासकीय दवाखाण्यात हलवलं होतं. उपचारानंतर तिला शासनाच्या संकटग्रस्त सखी महिला केंद्रात नेण्यात आलं. या प्रकरणी मुलीचे समुपदेशन करण्यात येत असले तरीही तिला मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours