भिवंडी : चिमुकल्याच्या रडण्याला कंटाळलेल्या मातेनं त्यांची नाल्यात बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यात घडली. सहा महिन्याच्या आजारी चिमुकला सतत रडून त्रास देत असल्याने या निर्दयी मातेनं कासपाडानजीकच्या मोठ्या नाल्यात त्याचा जीव घोटला. नरबळीचा संशय व्यक्त होत असल्याने पोलीस त्या दिशेनेही तपास करीत असल्याची माहिती सूत्राने दिली. या प्रकरणी निर्दयी मातेला भिवंडी तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.
कल्पना निलेश गायकर (२५) असे निर्दयी मातेचे नाव आहे. तर वृषभ असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे, आरोपी कल्पनाचा नवरा निलेश हा धन, पैसा मिळेल या लालसेने तंत्रमंत्र, बुआबाजीच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली असून हा प्रकार नरबळीचा असावा? असा कयास गावकऱ्यांकडून लावला जात आहे.
पोलीस सूत्रानुसार निर्दयी माता कल्पना हि पती व दोन मुलांसह तालुक्यातील कोळिवली (धापसीपाडा) येथे राहत असून, चिमुकल्यावृषभचा मृतदेह ८ ऑगस्ट २०१८ रोजी सांयकाळच्या सुमाराला तालुक्यातील कासपाडानजीकच्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात आढळून आला होता. मृतक वृषभ सर्दी, खोकला व तापाने आजारी असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी तंत्र मंत्राने इलाज सुरु असल्याने त्याची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. त्यामुळे तो सतत जोरजोराने रडत होता. त्याच्या रडण्याने त्रस्त झालेल्या कल्पना हिने कवाड (नित्यानंद नगर) येथील माहेर गाठले व बाळाला नाल्याच्या ओहळाच्या पाण्यात नेवून बुडवले. त्यानंतर तिने आईवडिलांकडे येवून मुलाला कोणीतरी बुडवले आहे. असे सांगून दुष्कृत्य लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी तिच्यावर संशय व्यक्त करून याची खबर तालुका पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला होता.
त्यानंतर वैद्यकीय अहवालानूसार भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र चिमुकल्याच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय महेश सांगडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनूसार तालुका पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून परिसरातील स्थानिक नागरिकांकडे गुप्त चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निर्दयी माता कल्पनाकडे वळवली. तिला ताब्यात घेवून चौकशी केली असता, मुलगा आजाराने त्रस्त असून सतत रडून त्रास देत होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याची हत्या केल्याची कबुली तिने पोलसांना दिली. मात्र आरोपी कल्पनाचा नवरा निलेश हा धन, पैसा मिळेल या लालसेने तंत्रमंत्र व बुवाबाजीच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वीही मोठ्या मुलाबाबतही असाच प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार नरबळीचाही असावा ? असा कयास स्थानिकांकडून वर्तवला जात असून पोलीस त्या दिशेनेही तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कल्पनाला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील करीत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours