पुणे : जलसंधारणाच्या कामासोबतच मनसंधारणाचं कामही होत आहे. पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजाची वीण आणखी घट्ट करायची आहे असं मत अमिर खान यांनी सत्यवेम जयते वॉटर कप स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं. पुरस्कारप्राप्त गावांना सॉईल हेल्थ कार्ड, पीक पद्धतीचे सल्ले आणि वृक्षारोपणासाठीही पानी फाऊंडेशन मदत करेल अशी घोषणाही त्यांनी कार्यक्रमात बोलताना केली. पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण अशा सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांच्या चौफेर टोलेबाजीने हा कार्यक्रम चांगलाच रंगला.

वॉटरकप स्पर्धेत पहिला क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडी (आंधळी) या गावेने मिळवला तर दुसरा क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड गावाने तर तिसरा क्रमांक बिड जिल्ह्यातल्या आनंदवाडी आणि नागपूर जिल्ह्यातल्या उमठा या गावाने पटकावला.
पहिला क्रमांक - टाकेवाडी (आंधळी), जि. सातारा, 75 लाख रूपये आणि स्मृती चिन्ह
दुसरा क्रमांक - भांडवली,जि.सातारा आणि सिंदखेड, जि. बुलडाणा, प्रत्येकी 25 लाख आणि स्मृती चिन्ह.
तिसरा क्रमांक - आनंदवाडी, जि. बीड आणि उमठा, जि. नागपूर. प्रत्येकी 10 लाख आणि स्मृती चिन्ह
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours