मुंबई: मोदी सरकारवर जोरदार टीका करुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाला पुन्हा एकदा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पक्षातील नेत्यांकडून कटकटींचा सामना करावा लागत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदार तयारी करत असतानाच महाराष्ट्रातील नेते मात्र त्यांची डोकेदुखी वाढवत आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. धक्कादायक म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल आठ दिग्गज नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नकारामुळे राहुल गांधी यांना मोठ्या डोकेदुखीला सामोरे जावे लागू शकते.
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून पाठवले होते. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कारभारात राहुल गांधी यांनी हस्तक्षेप केल्याशिवाय मार्ग निघेल असे वाटत नाही. 2014मध्ये मोदी लाटेत राज्यातील 48 पैकी काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. त्यात विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून तर राजीव सातव यांनी हिंगोलीतून विजय मिळवला होता. सातव सध्या गुजरातचे प्रभारी आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours