मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावलाय. आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे कधी दोन आकडी खासदारही निवडुन आले नाहीत आणि ते पंतप्रधानपदाचं स्वप्न बघतात, संगीत खुर्ची खेळतात असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. मुंबईत मंगळवारी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या मेळाव्यात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला टोला हाणत स्वबळाची भाषा केली मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात युतीबाबत मौन पाळलं तर शिवसेनेबद्दल एकही चकार शब्द काढला नाही.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
शरद पवारांना टोला - यांचे कधी दोन आकडी खासदार आले नाहीत आणि हे पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत.
चौकीदाराची भीती आपल्याला नसते ती कोणाला असते ? सीएमचा सुचक सवाल, गर्दीचं चोर चोर उत्तर.
राहुल गांधी काही ना काही खोटं बोलत राहतात, आपल्याला लोकं विचारतात, त्यांना काही विचारत नाहीत त्यामुळे ते काहीही बोलत असतात.
सध्या सुरू असलेली पायाभूत विकास कामे यापैकी एकही संकल्पना आमची नाही, ही सर्व 15-20 वर्षांपूर्वी नियोजित केली होती. मात्र कोणाकडे इच्छाशक्ती नव्हती.
गेल्या ४ वर्षात जितकं काम केलंय त्याच्या २५ टक्केही काम आघाडीनं केलं नाहीये.
कामाची चर्चा करता येत नाही म्हणून असहिष्णुता, सेन्सॉरशिप असे विषय काढले जातात.शरद पवारांना टोला - यांचे कधी दोन आकडी खासदार आले नाहीत आणि हे पंतप्रधान पदाची संगीत खुर्ची खेळत आहेत.
चौकीदाराची भीती आपल्याला नसते ती कोणाला असते ? सीएमचा सुचक सवाल, गर्दीचं चोर चोर उत्तर.
राहुल गांधी काही ना काही खोटं बोलत राहतात, आपल्याला लोकं विचारतात, त्यांना काही विचारत नाहीत त्यामुळे ते काहीही बोलत असतात.
सध्या सुरू असलेली पायाभूत विकास कामे यापैकी एकही संकल्पना आमची नाही, ही सर्व 15-20 वर्षांपूर्वी नियोजित केली होती. मात्र कोणाकडे इच्छाशक्ती नव्हती.
गेल्या ४ वर्षात जितकं काम केलंय त्याच्या २५ टक्केही काम आघाडीनं केलं नाहीये.
कामाची चर्चा करता येत नाही म्हणून असहिष्णुता, सेन्सॉरशिप असे विषय काढले जातात.
Post A Comment:
0 comments so far,add yours