तालुका प्रतिनिधि: संदीप क्षिरसागर
जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज श्री  संप्रदाय लाखनी   यांच्यावतीने आज लाखणी येथे जन्मोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण  रुग्णालय लाखनी  विद्यमाने   येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ संजय पोहरकर, नगराध्यक्षा ज्योती निखाडे, माया निंबेकर, डॉ चंद्रकांत निंबार्ते, डॉ मनोज आगलावे, प्रा धनंजय गिर्हेपुंजे,  डॉ दिगंबर कापसे, प्रा नाजुकराम बनकर, बाबुराव निखाडे, नगरसेवक ऍड कोमलदादा गभने, अजिंक्य भांडारकर, विक्रम रोडे, महेश आकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दरवर्षी दोन ऑक्टोबर ला मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजन करण्यात येते याहीवर्षी लाखनी येथे 107 हून अधिक उपासक मंडळींनी आणि नागरिकांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सेवा अध्यक्ष मनोज तऱ्हेकर, जिल्हा कमांडर गोपाल माकडे,जिल्हा संजीवनी प्रमुख राम मोटघरे, मनिष झिंगरे, राजु फंदे,  विष्णुदास तळवेकर, आशा शहारे, अशोक गायधनी, सचिन बावनकुळे, देवचंद लोखंडे, तेजराम बडवाईक, वंदना पाल मरसकोल्हे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले व जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख नागराज कोठेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours