मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण 32 उमेदवारांची ही यादी आहे. या तिसऱ्या यादीतही राज ठाकरे यांनी आपला पुतण्या आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला नाही. दुसरीकडे विक्रोळीतून विनोद शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आतापर्यंत मनसेनं 104 उमेदवारांची यादी जाहीर केला आहे.
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडणूक लढवत आहे. आजच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. वरळीत राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरे यांचे काका असलेले राज ठाकरे आपल्या पक्षाकडून वरळी उमेदवार उतरवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे. परंतु, आज तिसऱ्या यादीतही वरळी मतरसंघ टाळण्यात आला आहे.
मनसेची तिसरी यादी
भांडूप- पश्चिम संदीप जळगांवकर
विक्रोळी- विनोद शिंदे
मुलुंड- हर्षदा राजेश चव्हाण
वडाळा- आनंद प्रभू
उरण- अतुल भगत
पिंपरी- के.के. कांबळे
मिरा-भाईंदर- हरीष सुतार
बार्शी- नागेश चव्हाण
सांगोला- जयवंत बगाडे
कर्जत-जामखेड- समता इंद्रकुमार भिसे
शिरूर - कैलास नरके
आंबेगाव - वैभव बाणखेले
खेड आळंदी - मनोज खराबी
पुणे कँटोन्मेंट - मनिषा सरोदे
उमरगा - जालिंदर कोकणे
ओवळा माजिवडा - संदीप पाचंगे
पालघर - उमेश गोवारी
विक्रमगड - वैशाली सतीश जाधव
बदनापूर - राजेंद्र भोसले
राजापूर - अविनाश सौंदाळकर
दौंड - सचिन कुलथे
पुरंदर - उमेश जगताप
भोर- अनिल मातेरे
चाळीसगांव - राकेश जाधव
वसई - प्रफुल्ल ठाकूर
डहाणू - सुनील इभान
देवळाली - सिद्धांत मंडाले
लातूर ग्रामीण अर्जुन वाघमारे
भंडारा - पूजा ठक्कर
वरोरा - रमेश राजूरकर
भुसावळ - निलेश सुरळकर
डॅशिंग नितीन नांदगावकर सेनेत
दरम्यान, विक्रोळी मतरदासंघातून मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आणि डँशिंग नितीन नांदगावकर यांना मनसेकडून तिकीट मिळणार होतं. परंतु, त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. काल त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून हातावर शिवबंधन बांधलं. नितान नांदगावकर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाने मनसेला जोरदार धक्का बसला आहे. गेले काही वर्षे नितीन नांदगावकरांनी बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बदडून काढत चांगलंच सरळ केलं होतं. त्यामुळे ते प्रवाशांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले होते.
मात्र त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांनी काही काळ तडीपारही केलं होतं. नितीन नांदगावकर यांना मनसेचं विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून तिकीट ही मिळणार होतं. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी मनसेला सोडचिठठी देत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
===========================
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours