मुंबई, 3 ऑक्टोबर: अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी शिनसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. तसेच आज मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. दिपाली सय्यद ही मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड रिंगणात आहे. त्यामुळे दिपाली सय्यद आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात लढत रंगणार आहे.
शिवसेनेचे मुस्लिम सेलिब्रिटी मराठी कार्ड
कळवा मुंब्रातून अभिनेत्री दिपाली सय्यदला उमेदवारी देऊन शिवसेना 'मुस्लिमसेलिब्रिटीमराठी कार्ड' वापरणार आहे. रात्री उशीरा दिपाली सय्यदच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे.
या भाजपच्या खासदाराशी घेतला होता पंगा...
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई पाणी योजनेसंदर्भात माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी त्याबाबात माफी मागावी अन्यथा आपण महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours