मुंबई : काँग्रेसने आपली तिसरी यादी जाहीर केलीय. या तिसऱ्या यादीत 19 जणांचा समावेश आहे. काँग्रेसने डाव खेळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध माजी आमदार आशिष देशमुख यांना उमेदवारी दिलीय. आशीष देशमुख 2014मध्ये भाजपच्या तिकीटवर निवडून आले होते. त्यानंतर मतभेद झाल्याने त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी घरोबा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तगडा उमेदवार देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. नाना पटोले यांचंही नाव चर्चेत होतं. मात्र शेवटी आशीष देशमुख यांना काँग्रेसने आखाड्यात उतरवलं.
अशी आहे काँग्रेसची यादी
नागपूर दक्षिण-पश्चिम - आशिष देशमुख
नंदूरबार ST - उदेसिंग पडवी
साक्री ST - डी. एस. अहिरे
अकोला पश्चिम - साजिद खान मन्नन खान पठाण
अमरावती - शुभा खोडे
दर्यापूर SC - बळवंत वानखेडे
कामठी - सुरेश भोयर
रामटेक - उदयसिंह यादव
गोंदिया - अमर वरदे
चंद्रपूर SC - महेश मेंढे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours