सुनिता परदेशी मुख्य संपादिकाभंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी  तसेच  इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण व दुर्गम भागातून आशा स्वयंसेविकायांच्या मार्फत रुग्णांना संदरर्भीत करण्यात येते. यावेळी आशा स्वयंसेविका  यांना रुग्णां सोबत जिल्हा रुग्णालय येथे स्वतः यावे लागते. अशा  वेळी  उशीर झाल्यास मिळेल त्या ठिकाणी आशांना थांबावे लागते. रात्री अपरात्री प्रसुती करिता महिलांना घेऊन आल्यानंतर बराच वेळ त्यांना ताटकळत थांबावे लागते. हि गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा व जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा  यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय पेयींग वार्ड क्रमांक सहा येथे तळमजल्यावर आशा घर तयार करण्यात आले आहे. या आशाघराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या हस्ते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आशा स्वयंसेविका या गाव पातळीवर आरोग्यदूत म्हणून काम करत असतात त्या आरोग्य संस्था व ग्रामस्थ यांच्या मध्ये दुवा म्हणून आपली भूमिका पार पडत असतात प्रसुती बरोबरच इतर आजारावर देखील संदर्भ सेवा देण्या करिता आशांचा मोलाचा वाटा आहे. आशा स्वयंसेवीका यांना रुग्णांना घेऊन आल्यानंतर या आशा घराचा फायदा नक्कीच होईल. अशा भावना व्यक्त करून जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व आशा स्वयंसेवीकाना शुभेच्छा दिल्या.                                          याप्रसंगी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीषा साकोडे, जिल्हा समूह संघटक चंदू बारई, वित्त व पुरवठा सल्लागार प्रियंका मिश्रा, परिसेविका श्रीमती नंदनवार, गटप्रवर्तक सोनू सार्वे, आशा स्वयंसेविका वनिता भुरे, मनीषा निंबार्ते, जयश्री केवट उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours