पुणे: राहुल फटांगडे मृत्यूप्रकरणी आज आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीये. याआधी तीन आरोपींना तीन आरोपींना अटक करण्यात आलीये.
एक जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. दंगलीत राहुल फटांगडे याचा मृत्यू झाला होता. राहुलच्या मृत्यू प्रकरणात या आधी तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली होती. तरी देखील उर्वरित चार आरोपींचा तपास सुरू असल्याचंही पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.
आता याच प्रकरणातील आणखी एका आरोपीला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. पुणे पोलिसांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णीतून सुरज शिंदेंला  ताब्यात घेतलं. आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours