मुंबई: नाविन्याचा ध्यास, नव्या कल्पना आणि नव नवीन गोष्टी असतील तरच मराठी नाटकांना चांगले दिवस येतील असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. मुलुंड इथं आजपासून सुरू झालेल्या 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
नाटकांमध्ये भव्यता यावी
मराठी नाटकांमध्ये जोपर्यंत भव्यता येत नाही तोपर्यंत मराठी प्रेक्षक नाटकांकडे वळणार नाही. ही भव्यता सादरीकरणात आणि आशयामध्ये सुद्धा आली पाहिजे. नाटकांच्या विषयांमध्ये कमतरता नाही मात्र जोपर्यंत सादरीकरणात अमुलाग्र सुधारणा होत नाही तोपर्यंत मराठी नाटकांची दशा बदलणार नाही असंही पवार म्हणाले.
बारामतीतली नाट्यगृह
बारामतीत बांधलेली तीन नाट्यगृह अतिशय उत्तम दर्जाची आहेत. अशा प्रकारची नाट्यगृह जर महाराष्ट्रभर बांधली तर नाटकांचा मोठा प्रश्न सुटेल. नाट्यगृह नुसतं बांधूनही उपयोग नाही तर त्याचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवली पाहिजे.
कलाकारांनी भविष्याचं नियोजन करावं
अनेक कलाकार कामाच्या व्यापात भविष्याचं नियोजन करत नाहीत. त्यामुळं उतारवयात त्यांची परवड होते. अनेकांना तर आजारपणातल्या उपचारांचा खर्चही परवडत नाही. नाट्य परिषद यासाठी काही उपायोजना करत मात्र त्या अपुऱ्या आहेत. यासाठी नाट्य परिषदेनं आणखी उपक्रम राबवावेत त्यासाठी यशक्ती सर्व मदत करू असं आश्वासनही शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिलं.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours