सपादिका... सुनिता परदेशी
मृतांच्या कुटुंबायास 25 लाख   व जलदगती न्यायालयात खटला चालविला पाहिजे.

विमुक्त भटक्या जातीचे राजमंत्री मदन येरावार याना निवेदन दिले.

विमुक्त भटक्या समाजाचे नेते आमदार हरीभाऊ राठोड, देवानंद पवार, नारायण शिंदे यांची मागणी.

यवतमाळ(प्रतिनिधी): धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा या गावात काल विमुक्त -भटक्या जमातीचे  पाच लोकांना दगड, विटाने, लाठी काठीने ठेचून क्रूरपणे ठार मारले.या घटनेमुळे सम्पूर्ण समाजमन हादरून गेला आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील विमुक्त भटक्या जमातीचे शेकडो लोक जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. निषेधाचे व मागण्याचे निवेदन  जिल्हाधिकारी यांना देणार होते परंतु विमुक्त भटक्या जमातीचे राज्यमंत्री मदन येरावार यांची सभा  जिल्हाधिकारी कार्यालयात चालू होती. ही माहिती मिळताच उपस्थित शेकडो मोर्चाकराणी त्यानाच निवेदन देण्याचा आग्रह धरला. शेवटी मदन येरावार यांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारले. 


महाराष्ट्र सारख्या  पुरोगामी राज्याला काळिमा फासणारी हि घटना आहे. पाचही मृतक सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेठची  आहे. नेहमी प्रमाणे विठ्ठलाची गुणगान करीत भिक्षा मागणारा हा समाज सरकारी धोरण्याच्या उदासीन पणामुळे भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत आहे. लहान मुलांचे अपहरण करून  किडनी काडून घेतात या अफवेने या लोकांना पकडून 3000 ते 4000 लोकांच्या जमावाने ठार केले.  या घटनेचा राज्यभर निषेध होत आहे. भटक्या विमुक्तांचे पुर्नवसन करावे, राहण्यासाठी घर, कसण्यासाठी जमीन, शिक्षनाची व रोजगार निर्मिती करण्यात यावी अश्या अनेक समस्या प्रलंबीत आहे.या मागण्यांसाठी  शासन स्तरावर मागील अनेक वर्षा पासून लढा सुरू आहे. परंतु सरकार मात्र आयोगावर आयोग नेमून या समाजवर अन्याय करीत आहे.

पाचही मृतकाचे मृतदेह पिंपळखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ठेवण्यात आले आहे. या पाच मृतकामध्ये दादाराव शंकर भोसले, भारत शंकर भोसले,राजू श्रीमंत भोसले, हे तीन जण एकाच कुटुंबातील असून अगणु शंकर इंगोले व  भारत शंकर माळवे अशी त्यांची नावे आहे. जो पर्यंत सरकार मृतकांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नौकरी, 25 लाखाची मदत,जलतगती न्यायालयात हे प्रकरण चालविण्याचे व सर्वच मारेकऱ्यांना ताबडतोब अटक  करीत नाही तो पर्यंत पाचही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबातील लोकांनी ठाम भूमिका घेतली आहे. या घटनेचा निषेध मोर्चाचे नेतृत्व आमदार हरिभाऊ राठोड, देवानंद पवार, नारायन शिंदे यांनी केले.यावेळी भारतकुमार वातीले बाबूसिंग कडेल , साहेबराव पवार,झुंबरसिंग चव्हाण, एकनाथ शिंदे,डी. गोरे,भगवान मांडवकर, मोहन जगताप आदी शेकडो लोक उपस्थित होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours