मुंबई, 14 जून : राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. राज्य सरकारनं विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी हा संप पुकारलाय. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळतं. मात्र त्यात वाढ व्हावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे.
मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 11 हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या 2015 मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या डॉक्टरांनी केलीये. त्यामुळं ऐन पावसाळ्यात हे डॉक्टर्स संपावर गेल्यानं रुग्णांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आधीच डॉक्टरांची सुरक्षा अडचणीत आहे. त्यात वारंवार मागण्यांसाठी होणाऱ्या संपांमुळे रुग्णांचे मोठे हाल होतात. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा विचार करत आता राज्य सरकार काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, राज्य सरकार यावर कधी ठोस निर्णय घेणार हाही एक प्रश्नच आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours