भंडारा -
   राष्ट्रिय वन पर्यावरण प्रदुषन नियंत्रण संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश शाखा भंडाराच्या वतीने विद्यमान विधानसभा सदस्य नरेंन्द्र भोंडेकर यांच्या वाढदिवसा निमित्त विवीध प्रजातीच्या 501 रोपट्यांचे वाटप करण्यात आले.
मोठ्या प्रमाणात शहरीकरण व औद्योगीकरणामुळे वातावरणात बदल होऊन जागतिक तापमानात वाढ होत आहे.
            वाढत्या उष्णतेच्या समस्येवर मात करण्यासाठी, परिसराचे नैसर्गिक सौंदर्य टिकवण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
     या मोहिमेत जिल्हाअध्यक्ष सुरज परदेशी,लाँयन क्लब ब्रास सिटि,भंडाराचे अध्यक्ष लाँ.डाँ.बबन मेश्राम, अजय वासनिक, क्रिष्णा ठवकर,दीपक वाघमारे,नम्रता बागडे,राकेश सांडेकर,प्रशांत रणदिवे,नरेन्द्र मस्के,प्रज्वल पँरामेडिकल के संचालिका डाँ.सुलभा मेश्राम,नितेश मोगरे ,दिनेश गजभे,पकज दहिकर,मगेश मुरूकुटै,सतीश तुरकर,अमन तांडेकर,रुद्रिका परदेशी,अजय खांडेकर सह पर्यावरण प्रेमीनी सहभाग घेतला.
          या कालावधीत शासकीय निमशासकीय, वनीकरणात काम करणाऱ्या संस्था तसेच शाळा, महाविद्यालयांना रोपे वाटप करून परिसराचे हरित अच्छादन वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच पावसाळाच्या कालावधीत शासकीय तसेच खासगी मालकीचे पडीक क्षेत्र, बांध, रेल्वे, कालवा, रस्ताच्या कडेला, गायरान क्षेत्र येथे वृक्ष लागवड व्हावी या उद्देशाने शेतकरी व वृक्षप्रेमींना माफक दरात पुरवठा करण्यात येणार आहे. 
शासनाने सुरू केलेली हरित चळवळ अधिक लोकाभिमुख व्हावी आणि या प्रत्येकाचा सहभाग मिळावा या हेतूने या काळात ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहर व जिल्ह्यातून जवळपास अधिक - अधिक रोपांचे वाटप केले जाणार असून त्याचा लाभ घेण्याचे आव्हान प्रा. डाँ. बबन मेश्राम व सुरज परदेशी यांनी केले.


 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours