सांगली: सव्वा रूपया. या सव्वा रूपयासाठी सांगलीतल्या एका एसटी कर्मचाऱ्याला 26 वर्षे वनवास भोगावा लागलाय. सरकारी अनास्था एखाद्याचं सुरळीत सुरू असलेलं आयुष्य कशा प्रकारे खडतर मार्गावर आणू शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे सांगलीतले महादेव खोत. मात्र खडतर मार्गावरही आयुष्याचा प्रवास कायम ठेवत स्वाभिमानी महादेव खोतांनी न्यायाची लढाई जिंकली आणि आपल्यावरचा डाग पुसून काढला.
वयाच्या 62व्या वर्षीही शिवारात राबणाऱ्या महादेव खोतांचा वनवास अखेर संपलाय. मात्र त्यासाठी महादेव खोत यांना तब्बल 26 वर्षे कायद्याची लढाई लढावी लागलीय आणि ती देखील फक्त सव्वा रूपयांसाठी.
सांगलीचे रहिवासी असणारे महादेव खोत एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होते. प्रवाशांकडून सव्वा रूपये घेऊन त्याला तिकीट न दिल्याचा ठपका महादेव खोतांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांना कारवाईपोटी त्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.
कामगार न्यायालयापासून सुरू लढा उच्च न्यायालयापर्यंत येऊन पोहोचला. अखेर उच्च न्यायालयानं महादेव खोतांवरचे आरोप बाजुला सारत, त्यांना 22 वर्षांचे वेतन आणि सेवानिवृत्तीचे सर्व लाभ देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिलेत न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या 26 वर्षांचा खडतर प्रवासाचं चिज झालं ही त्यांची आज भावना आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours