नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हे दोन महत्त्वाचे सण तोंडावर आले असताना केंद्रानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे राखी आणि गणेशमूर्त्यांना जीएसटीतून वगळण्याचा. राखी आणि गणेशमूर्त्यांवर जीएसटी लावण्यात येणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केलंय. रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा हिस्सा आहे. त्यामुळे या परंपरांचा सन्मान करायलाच हवा असंही पियूष गोयल म्हणाले. येत्या 26 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, तर 13 सप्टेंबरला घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होतंय.
गणेशोत्सव सर्वात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात साजरा केला जात असल्यानं केंद्राच्या या निर्णयाचा मराठी जनतेला मोठा फायदा होणार आहे. रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. राखी आणि गणेश मूर्तींना जीएसटी लागू करण्यात येणार नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
रक्षाबंधन आणि गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा हिस्सा आहे. त्यामुळे या परंपरांचा सन्मान करायलाच हवा. त्यामुळे राखी, गणेश मूर्ती, हस्तशिल्प, हातमागाच्या वस्तू आदींना जीएसटीमधून वगळण्यात येत असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं. गणेशोत्सव आणि रक्षाबंधनच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. त्यामुळे या दोन्ही सणांशी संबंधित वस्तुंना जीएसटीतून वगळण्यात आल्यानं लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या २६ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. तर १३ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours