मुंबई: गायनकोकीळा लता मंगेशकर यांचा शुक्रवारी 90 वा वाढदिवस. दीदींच्या अजरामर गाण्याने गेली तब्बल सात दशकं अनेक पीढ्यांचं आयुष्य समृद्ध केलं. आपल्या स्वर्गीय सुरांची बरसात करणाऱ्या दीदींनी सुरवातीच्या काळात गायक आणि गीतकारांच्या हक्कांसाठी जोरदार लढा दिला. 

दीदींनी गाणं गायला सुरूवात केली तेव्हा गायक आणि गीतकारांना फारसा मान दिला जात नव्हता. चित्रपटाच्या शेवटी जी श्रेयनामावली असते त्यात गायक आणि गीतकारांचं नावही दिलं जात नव्हतं. भारतात गाण्यांमुळं चित्रपट हिट होतात. असं असतानाही त्यांना का श्रेय मिळत नाही याची खंत दीदींना होती आणि त्यासाठी त्यांनी आवाज उठवला त्यांच्या प्रत्नांमुळेच गायक आणि गीतकारांची नावं यायला लागली.

आज ज्या फिल्मफेअर पुरस्कारांना मोठं स्वरूप मिळालं त्या पुरस्कार समारंभातही गायक आणि गीतकारांना पुरस्कार मिळत नव्हते. मात्र त्यांच्याकडून गाणं म्हणून घेतलं जात होतं. पुरस्कार देणार नाही तर गाणं म्हणणार नाही अशी बाणेदार भूमिका दीदींनी घेतली आणि नंतर पुरस्कार मिळायला लागले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours