आजपासून वसंतराव नाईक साहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाव यासाठी यवतमाळ येथुन स्वाक्षरी अभियानाला प्रारंभ.

आज यवतमाळ येथे हरितक्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती निमित्य वसंतराव नाईक साहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाव यासाठी लोकनेते मा. खा. नानाभाऊ पटोले, आ. मनोहरराव नाईक, शेतकरी न्याय हक्क समिती चे देवानंद पवार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी अभियान प्रारंभ केला असुन हे निवेदन राष्ट्रपती श्री रामनाथ कोवींद यांना सादर करण्यात येणार आहे.



निवेदनात, 
भारतातील शेतकरी, शेतमजूरांकडुन नम्र विनंती केली की, 1970 व्या वर्षात भारतात भारी अकाल पडला होता, यात जनता अन्नासाठी दारोदार फिरुन लागली, त्या वेळेस अमेरिकेत जनावरे जी खाद्यपदार्थ खात होती ते खाद्यपदार्थ भारतातील नागरिकांना खाण्यास मजबुर झाली होती.
अश्या परिस्थितीत देशात अन्नधान्य उत्पादन उभारण्याचा काम वसंतराव नाईक यांनी केली होती. म्हणून त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हटले जाते.
शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा बनविण्याचे काम नाईक साहेबांनी केले. जो भारत अन्नासाठी दारोदार फिरुत होता तिच जनता समृद्ध झाली.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री च्या नात्याने त्यांनी कृषी क्रांती बरोबर पंचायत राज ची संकल्पना त्यांनी साकार केली.
भुदान यज्ञात त्यांनी विनोबा भावे यांना योगदान दिला, रोजगाराची निर्मिती केली असे अनेक योगदान वसंतराव नाईक साहेबांची राहीले.
अश्या समाजकार्य करणाऱ्या महान व्यक्ती वसंतराव नाईक जी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार याची मागणी केली.




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours