शिर्डी: साईबाबांकडे आशिर्वाद मागत आहेत. 2019 ला आम्हीच येणार असा दावा करताय. मग सत्ता दिली तिचा काय उपयोग केला ? असा सवाल करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसंच पंतप्रधानांनी देशवासियांना खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केली, हा देशद्रोह आहे असा घणाघातही त्यांनी केला.

शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याची सुरूवात शिर्डीपासून झाली.शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली.

भाजप १९८९ पासून राममंदिराचा मुद्दा उपस्थितीत करतेय. पण राम मंदिर कधी बांधणार हे सांगत नाहीये.मुळात निवडणुका आल्या की अचानक राम मंदिराच्या मुद्द्याची अनेकांना आठवण होते असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

खोटं बोलून सत्ता मिळवतात आणि खोटा प्रचार करतात देशातील जनतेला खोटी आश्वासनं दिली. देशातील लोकांना फसवलं हा देशद्रोह आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली.

साईबाबांकडे स्वतः साठी कोणत्याही पदासाठी आशिर्वाद मागितला नाही. शिवसैनिकांचं हे प्रेम मला कायम मिळत राहावे हाच आशिर्वाद मागितला असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच सत्तेसाठी लाचारी पत्कारून स्वाभिमान गहाण टाकणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान, त्याआधी उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत साईमंदिरात सपत्नीक दर्शन घेतलं. त्याच्यासोबत मुलगा आदित्य ठाकरेंही साईदर्शनाला सोबत होता. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा उद्धव ठाकरे घेताहेत त्याची सुरूवात आज शिर्डीतून झाली. मेळाव्याला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे मनोभावे पुजन करत सहकुटुंब आशिर्वाद घेतलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours