(ज्वलंत मागऩ्या पुर्ण करण्यासाठी गावकऱ्यांकडुन कंपनी चा काम बंद आंदाेलन)
जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर

लाखनी- माैजा मानेगाव/सडक येथील सर्व गावकरी यांनी ग्रामपंचायत मानेगाव तर्फे अशाेका बिल्डकॉम कंपनी ही मानेगाव मधेच कार्यरत असुन मानेगाव मधे सर्विस राेड,बँरीकेट,नाल्या,बसस्टॉप ची व्यवस्था नसल्यामुळे या सर्व साेयींची मानेगाव येथे मंजुर करुन लवकारात लवकर व्यवस्था करन्याकरिता कंपनी ला निवेदन देऊन अशाेका बिल्डकॉम कंपनी च्या निदर्शनास आणुन दिली.मानेगाव /सडक या गावाला साेडुन अन्य सर्व गावात विकास करण्यात आला असुन निवेदन दिल्या तारखेपासुन १५ दिवसात समस्या मंजुर करुन काम सुरु करन्यात यावा.अन्यथा मानेगाव वासींयाकडुन कंपनीच्या विराेधात काम बंद करुन,मागन्या पुर्न हाेईपर्यंन्त अशाेका बिल्डकॉम कंपनी मधे ठिय्या आंदाेलन करन्यात येईल असा ईशारा ग्रामवासिंयाकडुन देण्यात आला हाेता.या आशया चे निवेदन ग्रामपंचायत मानेगाव व भारतीय जनता माेर्चा चे प्रशांत गायधनी यांच्या वतीने दिलेले हाेते.
आज दिनांक 22-10-2018 ला अशोका बिल्डकॉन कंपनी येथे ग्रामपंचायत मानेगाव व भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने  जाहीर निषेध व कामबंद  आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रमुख   मागण्यांमध्ये  मानेगाव येथे अंडरपास  ( उडान पुल ) ,दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड, पक्क्या नाल्या आणि प्रवासी निवारा ह्या सर्व मागण्या मान्य करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात देण्यात आले. या आंदोलनात  मा.आमदार बाळाभाऊ काशीवार यांनी मध्यस्थी घडवून आणली, आणि आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सहभागी  सरपंच नरेंद्र भांडारकर, उपसरपंच पंकज चेटुले, प्रशांत गायधने तालुका अध्यक्ष भाजयुमो, उमेश गायधनी भाजयुमो ता.सचिव , संदीप भांडारकर, सचिन चेटुले, सविता खराबे ग्रा.सदष्य, अनिता शेबे, यशवंत चानोरे मा.सरपंच ,नितेश रोटके,हीरामनजी खराबे,रामदयाल डोरले,समस्त मानेगाव वाशी उपस्थित होते.






Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours