(नगरपंचायत लाखनी यांच्या संयुक्त कार्यवाही ,३० हजार दंड वसुल)
जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
लाखनी- प्लॉस्टिक बंदी अमलबजावणीसाठी प्रशासनाने कंबर कसली असुन एका दिवसात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ व लाखनी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने १२३ कि.ग्र.नॉनवाेवन बँग ,कँरीबँग ,प्लास्टिक पिशव्या जप्त केले आहे.प्लॉस्टिक अँन्ड नॉनवाेवन बँग बाळगणाऱ्यांकडुन ३०,०००/-रु.दंड वसुल केला व पाेलिस कार्यवाही करण्यासाठी पंचनामा केला.
------राज्य शासनातर्फे २१ जुनपासुन प्लॉस्टिक बंदी सुरु करण्यात आली असुन या बंदीच्या अमलबजावनीसाठी विवीध शहरात प्लॉस्टिक जप्तीची माेहीम प्रशासनाने सुरु केली असुन प्रत्येक शहरात प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा झपाट्याने उगारण्यात आला आहे. लाखनी शहरात सिंधी लाईन,नँशनल हायवे,च्या बाजुला असणाऱ्या दुकांनावर कार्यवाही करुन जवळपास १२३ कि.ग्र.नॉनवाेवन बँग जप्त करण्यात आल्या आहेत.या संयुक्त कारवाईमध्ये महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अर्जुण राठाेड,व महेश भिवापुरकर तसेच नगर पंचायत लाखनी चे मुख्याधिकारी कांचन गायकवाड,अभियंता नंदकिशाेर यवतकार व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.या नंतर ही अशीच जप्तीची कार्यवाही सुरुच राहणार असल्याचे या वेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक च्या अधीकारीयांनी या वेळी सांगितले.
Post A Comment:
0 comments so far,add yours