मुंबई, 29 नोव्हेंबर : मुंबईमध्ये रात्री वीज चोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रोत्रीच्या वेळी वीज चोरी करणाऱ्यांवर छापे टापे टाकण्यात आले. अँटॉप हिलमध्ये वीज चोरीचा हा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी वीज चोरी करताना छापे टाकले आणि रंगे हात 12 लोकांना आणि काही बेस्ट कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यात वीज चोर माफियादेखील आहे ज्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

अँटॉप हिल परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी सापळा रचून छापेमारी केली. पोलिसांना पाहताच घटनास्थळी धावपळ झाली पण यात पोलिसांनी 12 लोकांनी ताब्यात घेतलं आहे.

मुंबईच्या या एकाच परिसरातून तब्बल 68 वीज चोरीला गेल्याचे गुन्हे रजिस्टर करण्यात आले आहेत. त्यामुळे ही तर नागरिकांची सर्रास फसवणूक आहे.

दरम्यान, पोलीस या सगळ्यांचा कसून तपास करत आहे. तर यात आणखी कोणती टोळी आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours