नाशिक : नाशिकमधील एका सभेदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीश महाजन हे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये, उद्धवजी.. छान चाललंय की नाही आपलं, असे उद्गार काढले, आणि टाळ्यांचा गजर झाला. तर दुसरीकडे कायमच ‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंचा सूर आज बदलला. उद्धव ठाकरेंनी चक्क युतीच्या चांगल्या कामांचं कौतुक केलं, आणि मी कधी चांगल्या कामांमध्ये खोडा घातलाय का, असा प्रश्न त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना विचारला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours