चंद्रपूर: चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १८ पोलिस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्यालयातील 11 आणि इतर ठाण्यांतील 7 अशा एकूण १८ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांचासुद्धा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील कर्मचारी पोलीस अधीक्षकांच्या उद्देशाला हरताळ फासत होते. कोणतीही सूचना न देता सुटीवर जाण्याचे प्रकार वारंवार घडत होते. पोलीस प्रशासनाकडून अनेकदा त्यांना सूचनाही देण्यात आल्या. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही. अखेर पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी 18 पोलिस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला. निलंबनाचे आदेश निघाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
पोलिस मुख्यालयातील 11 आणि इतर ठाण्यांतील 7 असे एकूण १८ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनाचे आदेश मुख्यालयातून निर्गमित करण्यात आले आहेत. यात दोन महिला कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश असून, चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे हे विशेष.
Post A Comment:
0 comments so far,add yours