पुणे: EVM घोटाळ्यावर माझा विश्वास नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर बारामतीत घोटाळा करून दाखवा, असं थेट आवाहन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही यांचीच सत्ता असताना शहरातील प्रश्न प्रलंबित कसे?  असा सवाल करत अजित पवार यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

पिंपरी चिंचवड शहराला आता वाली राहिला नाही, कारभारी शहराचा विकास करतायत की स्वत:चा हे त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करावा असं म्हणत पिंपरीतल्या भाजपच्या कामावर अजित पवार यांनी टीका केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours