राळेगणसिद्धी, 04 फेब्रुवारी : अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मात्र अण्णांची तब्येत उपोषणामुळे खालावली आहे. त्यांचं वजनही कमी झालं आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील अण्णांची आज भेट घेणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे पुण्याहून राळेगणसिद्धीसाठी रवाना झाले आहेत.
दरम्यान, मला जर काय झालं तर या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरावं असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. पण रविवारी मुख्यमंत्री आणि अण्णा हजारे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्यानं अण्णा उपोषण सोडतायेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राळेगणसिद्धीमध्ये रविवारी अण्णांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी अण्णा आणि मुख्यमंत्री यांच्यात फोनवरून संभाषण घडवून दिलं. लेखी आश्वासन देण्याची अण्णांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून, तसं पत्रच गिरीष महाजन आज अण्णांना सुपूर्द करणार आहेत. त्यामुळं अण्णा हजारे आज उपोषण सोडणार असल्याची दाट शक्यता आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours