मुंबई, 04 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे हा अर्थ संकल्प आज दुपारी सादर करतील. निवडणुक वर्षात महापालिका मुंबईकरांसाठी काय काय आर्थीक तरतूद करतायेत याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे. कालच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्त अजोय मेहता आणि महापालिका कामगार संघटनांच्या प्रतिनिधीशी झालेल्या बैठकीत बीएमसी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एकमत झालं.
याची अंमलबजावणी देखील लवकरच करण्यात येणार असल्यामुळे महापालिका कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण मुंबईकरांसाठी काय खूश खबर असणार आहे. हे आज दुपारी अर्थ संकल्प सादर झाल्यावरच स्पष्ट होईल.
बीएमसी अर्थ संकल्प
१) कोस्टल रोडसाठी विशेष तरतूद.
२) पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रस्तावीत प्रकल्पासाठी नीधी उपलब्ध करणार.
३) खड्डेमुक्त रस्त्यांची निर्मिती.
४) जीर्ण जलवाहिन्या बदलने, जलववितरण व्यवस्था बळकट करणे.
५) घनकचरा आणि डंपिग वेवस्थापन.
६) भांडवली कामांसाठी खर्च १० हजार कोटींवर जाण्याची शक्यता.
७) पादचारी उड्डाण पूलांची निर्मिती आणि दुरूस्ती.
८) बीएमसी विविध परवानगी शल्कात वाढ होण्याची शक्यता.
९) नागरी कचरा वर देखील कर संदर्भात विचार होऊ शकतो.
१०) जकात कर रद्द झाल्यामुळे मालमत्ता करांवर लक्ष केंद्रीत करणार.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours