रिपोर्टर-हर्षिता ठवकर
करडी (पालोरा) : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मोहाडी तालुक्यातील कृषी विभागाला २१९ शेततळ्यांचा लक्ष्यांक प्राप्त झालेला होता. या योजनेसाठी एकूण ३७० अर्ज शेतकऱ्यांनी ऑनलाईन सादर केले होते. प्राप्त लक्षांकापैकी आतापर्यंत ९४ शेततळ्यांचे काम पूर्ण होऊन त्यावर ४८.८४ लाखांचा खर्च करण्यात आला. मागेल त्याला शेतबोडी योजनेंतर्गत एकूण ७ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ५ बोड्यांचे काम पूर्ण झालेले असून यावर १.४३ लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे.
मोहाडी तालुक्यात मागील चार वर्षांपासून एका पाण्याने खरिपाची शेती नुकसानग्रस्त होत आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने नैसर्गीक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर असते. तेथे शेतीला सिंचन ही बाब तर दुरापस्थच ठरते. हजारो एकर शेती मागील तीन वर्षांपासून रोवणीविना पडीत राहत आहे. खंड पडणाºया पावसामुळे रोवणीचा हंगाम लोटून जातो. दुबार पेरणी करावी लागते. त्यावर उपाय म्हणून स्वत:ची सिंचनाची सोय असावी तसेच शेतातच पाण्याचा साठा निर्माण व्हावा, भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेती व विहिरींना लाभ व्हावा, या शेतकऱ्यांच्या मागणीला लक्षात घेत शासनाने मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला शेतबोडी योजना कार्यान्वित केली. तालुक्याला शेततळे व शेतबोडी निर्माणाचा मागणीनुसार लक्ष्यांक ठरवून देण्यात आला. शासनाचे वतीने मागेल त्याला शेततळे या योजनेचा निर्णय १७ फेब्रुवारी २०१६ रोजी निर्ममित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेततळ्याचे प्रकार व आकार व जागेची निवड करण्यात येते. ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांना सदर योजनेचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांना दोन प्रकारच्या शेततळ्यांना लाभ दिला जातो. यात 'इनलेट आऊटलेट'सहीत शेततळे यांचा समावेश आहे.
इनलेट आऊटलेटसहीत शेततळ्यांमध्ये पाणी आत भरण्याचा मार्ग व बाहेर काढण्याचा मार्ग दिला जातो. भौगोलिक पाणलोट क्षेत्रातून वाहत येणारे पावसाचे पाणी यात साठविले जाते. दुसऱ्या प्रकारात इनलेट व आऊटलेट नसतो. शेततळ्यांत कृत्रिमरीत्या बाहेरुन पाण्याचा भरणा केला जातो.
मोहाडी तालुक्यात कृषी विभागाने लोकांची मागणी व गरज लक्षात घेत शेततळे व शेतबोड्यांचे नियोजन करुन कामाला सुरवात केली. निर्धारित २१९ शेततळ्यांच्या लक्षांकापैकी ९४ शेततळे पुर्ण केले. शेतबोड्यांच्या ७ लक्षांकापैकी ५ शेतबोड्या पूर्ण करण्यात आल्या. बांधकामाच्या आकारमानानुसार शेततळ्यांना जास्तीत जास्त ५० हजार तर शेतबोड्यांच्या ७ लक्षांकापैकी ५ शेतबोड्या पूर्ण करण्यात आल्या. बांधकामाच्या आकारमानानुसार शेततळ्याना जास्तीत ५० हजार त शेतबोड्यांना ४२ हजारापर्यंत अनुदान शासनाचे वतीने देय असून यावरील अधिकचा खर्च शेतकऱ्यांनी स्वत: करावयाचा आहे. ९४ शेततळ्यांचे कामावर आतापर्यंत ४८.८४ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तर मागेल त्याला शेतबोळी योजनेंतर्गत ५ बोळ्यांवर १.४३ लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे.

शेततळ्यांची ५० टक्के कामे अपूर्ण
मोहाडी कृषी विभागाला प्राप्त लक्षांकापैकी आतापर्यंत २१९ पैकी ९४ शेततळ्यांचे काम पुर्ण करण्यात विभागाला यश आले. उर्वरित कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी होतात, यावर कृषी विभागाची कामगिरी अवलंबून राहणार आहे. लक्षांकपूर्तीसाठी कृषी विभागाच्या जनजागृतीची व मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.

मागेल त्याला शेततळे व शेतबोडी योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. एका पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता यात आहे. शेतकऱ्यांनी या योजनेतील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. मागील वेळी ज्या शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला त्यांना पाऊस खंडित झालेल्या काळात रोवणीची कामे वेळेवर करता आली.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours