भंडारा :-  विद्यार्थीनीनी आपल्या महाविद्यालयीन शैक्षणिक शिक्षणासोबतच विविध विकास कौशल्ये व अद्ययावत ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन एल.एल.सी चे जिल्हा समनवयक संजय डोहळे यांनी केले.            ते भंडारा येथील नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात कौशल्य विकास यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाराष्ट्र शासनाची सारथी संस्था व विद्यार्थ्यांचे करिअर कौशल्य' या विषयावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते.           कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, नूतन कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य निलू तिडके, एल.एल.सी चे जिल्हा समन्वयक संजय कोहळे, समीर वर्ल्ड काम्पुटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

            पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच भाषाकौशल्य, संवादकौशल्य, सादरीकरण कौशल्य, मुलाखत तंत्र, चालू घडामोडींची माहिती, संदर्भग्रंथ व वृत्तपत्राचे वाचन आणि मोबाईलचा सुयोग्य व मर्यादीत वापर या बाबींप्रती जागरूक राहिल्यास रोजगार व स्वयंरोजगार मिळण्यास मदत होईल असेही मत संजय डोहळे यांनी व्यक्त केले. व प्राचार्य तिडके यांनी महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर व भविष्याप्रती सतर्क राहणे आवश्यक असून आपल्या हातून समाजोपयोगी कार्य झाले पाहिजे

असे मत व्यक्त केले. तर शासकिय योजनांची माहिती व त्याला लागणारे सर्व कागद पत्र तसेच सारथी व एम.के.सी.एल. बाबतीत सविस्तर माहिती समीर वर्ल्ड काम्पुटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज यांनी दिली. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्राचार्य निलू तिडके यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनीं  मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours