वच्छालाबाई सोनवणे यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू भंडारा शहरातील शुक्रवारी पेठ राजेंद्र वाड येथील रहिवासी 70 वर्षीय महिला श्रीमती वच्छालाबाई सोनवणे ह्या आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 पासून जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालय भंडारा समोर बेमुदत आमरण उपोषणावर सुरू............. रिपोर्. अजय वासनिक....भंडारा शहरातील सुभाष वाड येथील नझूल सीट क्रमांक 4 फ्लॅट नबर 38 वर त्याच वार्डातील एका व्यक्तीने बेकायदेशीर अतिक्रम करून घराचे बांधकाम केले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो त्यामुळे यापूर्वी गावातील काही लोकांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्यानुसार नायब तहसीलदार भंडारा यांच्या आदेशानुसार ते  अतिक्रम तोडण्यात आले होते मात्र पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रम करून बांधकाम सुरू असताना वच्छाला सोनवणे हिने जिल्हाधिकारी भंडारा नगरपरिषद भंडारा तहसीलदार भंडारा यांच्याकडे सतत तक्रारी करून  स्वतः भेट घेऊन अतिक्रम हटवण्याची विनंती केली मात्र अतिक्रम न हटवल्यामुळे त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून असलेले अतिक्रम हठविण्यात यावे अशी मागणी केली आहे.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours