मुंबई, 03 जुलै : मुंबईसह उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय. डोंबिवली, ठाणे, सायन, दादर परिसरात संततधार सुरू आहे. मुंबईकरांनो आज कामानिमित्त घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यायला विसरू नका.
हवामान विभागानं मुंबईत पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं इथं मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला तर त्याचा निश्चितपणे फटका मुंबईच्या लाईफलाईनला बसू शकतो. पण जून महिन्यात मुंबईत समाधानकारक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या नोंदीनुसार मुंबईत ७९५.५ मिलीमीटर पाऊस पडलाय.
गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जूनमध्ये पडलेला पाऊस समाधानकारक आहे. दरम्यान, बुधवार ४ जुलै रोजी मुसळणार पाऊसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविलाय. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
कोकण, गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. पण पावसाचा जोर वाढलाच तर गरज असल्यास बाहेर पडा. धोक्याच्या ठिकाणी जाऊन जीव धोक्यात घालू नका. असं आव्हान करण्यात येत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours