कोल्हापूर -  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये एखादा माणूस पदावर बसला की लगेच त्याच्या खुर्चीला सुरुंग लावला जातो मात्र आरएसएस पासून प्रेरणा घेणाऱ्या आमच्या भाजपमध्ये तसं काही होत नाही अशी घणाघाती टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये न्युज 18 लोकमतशी बोलताना केली. राज्याचे मुख्यमंत्रीही संवेदनशीलतेने काम करत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही असं स्पष्टीकरणही पाटील यांनी यावेळी दिलं. राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला.

गेल्या 4 वर्षात आम्ही एकही निवडणूक हरलो नाही. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आहे, त्यामुळे आमचा प्रभावही संपलेला नाही. उलट विरोधक एकत्र आले की त्यांची ताकद वाढते म्हणूनच आम्ही शिवसेनेला आमच्यासोबत येण्याचं आवाहन करत आहोत, असं ते म्हणाले. सगळ्याच पक्षांनी हवं असल्यास वेगवेगळं लढावं. त्यानंतर प्रत्येक पक्षाला आपापली ताकद समजेल, असंही ते म्हणाले. मात्र यातही भाजप अग्रणी असेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours