राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजप शिवसेनेवर बोलायची औकात नसल्याची जहरी टीका राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यतील शिंदेखडा येथे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांची बुराई नदी परिक्रमा समाप्ती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं चांगला समाचार घेतला. या दोन्ही पक्षांनी परिवाराचा सर्वांगीण विकास केला असल्याची टीकाही त्यांनी केली.
इतकी वर्ष सत्तेचा डल्ला खाणाऱ्यांनी हल्लाबोल केला आहे, मात्र लोकांना सर्व कळत असल्याचेही ते या भाषणा दरम्यान म्हणाले. दरम्यान मंत्री जयकुमार रावल यांना मंत्री मंडळात लवकरच बढती मिळेल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
Post A Comment:
0 comments so far,add yours