रिपोर्टर:हर्षीता ठवकर
चुल्हाड (सिहोरा) : शेतकऱ्यांचे संदर्भात महत्वपुर्ण प्रशासकीय कारभार करणारे तलाठी कार्यालय विकासाचे प्रवाहात आणले जात नाही. सिंदपुरी येथील तलाठी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार जनावरांचे गोठ्यातुन करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि तलाठी त्रस्त झाले आहे.
सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात शेतकाऱ्यांचे दस्तऐवज संदर्भात महत्वपूर्ण प्रशासकीय कामकाज करण्यासाठी तलाठी कार्यालय आहेत. या कार्यालयाची अवस्था चिंता वाढविणारी आहेत. या कार्यालयात शेतकऱ्यांचे महत्वाचे दस्ताऐवज ठेवण्यात येत आहे. पंरतु या दस्तऐवजाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सिंदपुरी गावात असणारी साझा क्र. १३ चे तलाठी कार्यालय जनावराचे गोठ्यात आहे. या गोठ्यात प्रशासकीय कारभार करणारे सुविधा नाहीत.
या तलाठी कार्यालयाचे दरवाजे मजबुतीकरण नाही. बैठकीची व्यवस्था नाही. प्रशासकीय कार्यालयासारखे वातावरण नाही. यामुळे तलाठी आणि अन्य कर्मचाऱ्यांची मानसिकता राहत नाही. शेतकरी सातबारा अन्य दस्तऐवजकरिता कार्यालयात धाव घेत आहेत.
परंतु उन्हाचा पारा वाढला असतांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही.
कार्यालयात दर्जेदार सुविधा नाही. या तलाठी कार्यालयात साधे शौचालय नाही. गरिबांना व त्यांचे घरी शौचालय नसल्यास शासन योजनेकरिता पात्र ठरवित नाही. परंतु प्रशासकीय कार्यालयात या सुविधा नसतांना कोणतीच कारवाई केली जात नाही. जुन्या कालावधीपासून तलाठी कार्यालयाची दशा आणि दिशा बदलविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.
गावात राजस्व विभागाची रिक्त जागा आहे. लोकप्रतिनिधीचे स्थानिक विकास निधी आहे. या निधीअंतर्गत साधे कार्यालयाचे बांधकाम होत नाही.
गावात समाज भवनाचे बांधकामाचे पूर आले आहे. या भवनाचा उपयोग होत नाही. शासनाचा निधी व्यर्थ खर्च होत आहे. प्रशासकीय कारभाराकरिता पक्के इमारत बांधकाम करण्याची गरज आहे. यासंदर्भात अधिक माहितीकरिता तलाठी गणेश राहांगडाले यांना संपर्क साधले असता होवू शकले नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours