मुंबई, 09 जून : मुंबईच्या फोर्ट भागात आज पहाटे 4 वाजता कोठारी मँशन इमारतीला भीषण आग लागली. सीएसटी स्थानकाच्या समोरच कोठारी मँशन नावाची इमारत आहे. आग इतकी भीषण आहे की इमारतीचा काही भाग कोसळला आहे. यात अग्निशमन दलाचे 2 अधिकारी जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत कुणी जखमी झाल्याचं वृत्त सुदैवानं अजूनतरी आलेलं नाही. कारण गेल्या 2 वर्षांपासून ही इमारत रिकामी आहे. त्यामुळे या भीषण अपघातात सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही आहे.
दरम्यान, या इमारतीच्या तळ मजल्यावर एका हॉटेलमध्ये डागडुजीचं काम सुरू होतं. तिथूनच आगीला सुरुवात झाली असा संशय व्यक्त करण्यात येतोय. सीएसटी स्थानकाबाहेरच जनरल पोस्ट ऑफिस आहे. त्याच्या अगदी समोर ही इमारत आहे. इथून अर्ध्या किलोमीटरवर रिझर्व बँकेचं मुख्यालयदेखील आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours