कोल्हापूर, 17 जून : पत्रकार गौरी लंकेश यांचा मारेकरी परशुराम वाघमारेचा ताबा एसआयटी घेणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून एसआयटी  ताबा घेणार आहे. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्र एसआयटी कर्नाटक एसआयटीच्या संपर्कात आहे. लवकरच एक पथक बंगळुरूला जाणार आहे.
एका बाजुला महाराष्ट्रात दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्येसंदर्भात नेमलेल्या तपास यंत्रणांनी हात टेकले. पण कर्नाटकच्या विशेष तपास पथकानं गौरी लंकेश यांच्या हत्येच्या षडयंत्राचा पर्दाफाश केलाय. हत्येच्या आरोपाखाली  अटक केलेल्या परशुराम वाघमारेनं धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिलीय.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात पुन्हा एकदा महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं. तब्बल सहा जणांना अटक केली गेली.
के टी नाविनकुमार
मनोहर येडवे
सुजितकुमार ऊर्फ प्रवीण
अमोल काळे ऊर्फ भाईसाब
अमित देग्वेकर
परशुराम वाघमारे
हे 6 जणही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आहेत. यातल्या परशुरामच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा झालाय.
- परशुरामनंच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या
- त्याने बेळगावात पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
- तो अनेक दिवस गौरी लंकेश यांच्या मागावर होता
- कर्नाटकमधील सिंदगीत राहणारा परशुराम हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित
- कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलातून झाल्याचा संशय
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours