मुंबई, 23 जून : काँग्रेसने आज पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत लोकसभेतील पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती केली आहे. खरगे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
हेही वाचा
मोहन प्रकाश मूळचे काँग्रेसवासी नव्हते. त्यांच्यावर कायम हा आरोप केला जात होता. त्यात वारंवार काँग्रेसचा राज्यांत घसरता क्रम यामुळे मोहन प्रकाश यांच्याविषयी नाराजी होती. अखेर राहुल गांधी यांनी मोहन प्रकाश यांना हटवण्याचा निर्णय घेतला. या बदलाबरोबरच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी जे. डी. सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना सहसरचिटणीस म्हणून नियुक्त केले आहे.
कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे?
-गुलबर्गामधून दोनवेळा काँग्रेसचे खासदार
-विद्यमान लोकसभेत काँग्रेसचे नेता.
-मनमोहनसिंग पंतप्रधान असताना दीड वर्ष रेल्वेमंत्री
- त्यापूर्वी ते श्रम आणि रोजगारमंत्री
- दहा वेळा कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे आमदार
-येडीयुरप्पा मुख्यमंत्री असताना कर्नाटक विधासभेचे विरोधी पक्षनेतेपद
-विद्यार्थी चळवळीत सहभागी
- कामगार संघटनांसाठी केसेसही लढल्या
- आक्रमकता ही जमेची बाजू
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours