मुंबई : राज्य सरकारचा शिक्षणसम्राटांना मोठा दणका दिला आहे. सरकारने अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे. खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे.
सरकारने 23 जून 2017 रोजी हा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती. पण आता दरवर्षी मे महिन्यात खासगी शाळांमधील शिक्षक भरती राज्य सरकारच करणार आहे. शिक्षक भरतीसाठी व्हिजिबल टू ऑल टिचर्स या पोर्टलचा उपयोग केला जाणार आहे. शिक्षण सेवकांना कोणती संस्था मिळेल त्याचंही नियंत्रण राज्य सरकारकडे असेल. वर्षातून दोन वेळा शिक्षणसेवकांची भरती होणार आहे.

राज्य सरकार अभियोग्य आणि बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित शिक्षणसेवकांची खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अनुदानास पात्र शाळांत नियुक्ती करणार आहे. मात्र अशा भरती प्रक्रियेतून अल्पसंख्याक वर्गाच्या शाळांना वगळले आहे.

पहिली खासगी संस्थेतील भरती 12 डिसेंबर 2017 ते 21 डिसेंबर 2017 या कालावधीत झालेल्या परीक्षेवर आधारित असेल. सरकारच्यावतीने जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिकेचे आयुक्त सरकारकडून भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours